तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह परिसरास गुरुवारी रात्री सुमारे तास ते दीड तास वादळवा-यासह झालेल्या अवकाळी मुसळधार झोडपुन काढले.  गुरुवारी राञी तीन तासात 60.2 मिमी. पाऊस झाला.  तुळजापूर शहरसह परिसरात रात्री 9.45 वाजता वादळवा-या सह मुसळधार पावसास आरंभ झाला. एक ते सवातास धुवाधार बरसला. नंतर शुक्रवार पहाटे  पर्यत पाऊस चालुच होता.  विजेचा कडकडाट आणि वादळी वादासह जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन

विस्कळीत झाले. या पावसात भाविकांसह शहरवासियांचे चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे काहींना रात्र जागून काढावी लागली.


घरात शिरलेले पाणी मोटारीने काढले!

या पावसात आरादवाडी येथील बापु जाधव  तसेच जिजामाता नगर मधील सुनील राऊत, अश्विनी काळे, बापू शिंदे, काका कुलकर्णी, सचिन कुकीळ, प्रदीप हंगरकर यांच्या घरात पाणी शिरले होते. पाणी एवढे आले होते कि ते पाणी मोटरीने काढावे लागले.


मोरडा तलाव फुटला 

तुळजापूर तालुक्यातील  मौजे मोरडा येथील खडीमशीनच्या बाजूचे तळे गुरुवार दि. 29 मे  रोजी राञी झालेल्या मुसळधार पावसात फुटल्याने  तीन चार शेतकऱ्यांचे दोन ते तीन हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरील तळ्यात राँ मटेरियल टाकल्याने कँनाल तुंबुन पाणी दाब वाढुन तळे फुटल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी होते. या  दुर्घटनाग्रस्त तळ्यास शिवसेना शिंदे गटचे शेतकरी सेना अध्यक्ष गणेश नेपते यांनी पाहणी केली.

 
Top