भूम (प्रतिनिधी)- रस्ता होण्यासाठी भूम तालुक्यातील अंतरगाव येथील ग्रामस्थांनी मिळून रोडवर पाच फूट खड्डा खोदून त्यात कमरेपर्यंत स्वतःला मातीमध्ये बुजून घेऊन  तीन तास आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील ईडा ते गणेगाव अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू आहे. यामध्ये अंतरगाव गावातील 400 मीटर सिमेंट काँक्रिटीकरण, व इतर 4.5 किमी डांबरीकरण अशा प्रकारचा हा रस्ता आहे. तालुक्यातील अंतरगाव येथील समस्त ग्रामस्थांनी पाथरूड रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करण्याची मागणी निवेदनामध्ये दिली आहे. मागील दोन वर्षापासून बार्शी, पाथरूड, अंतरगाव हद्दीतील रोड मंजूर असून अद्यापही त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रस्ता खोदून अर्धे शरीर खड्ड्यामध्ये पुरून रोडवरच ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खराब रोड मुळे शाळकरी विद्यार्थी होणारी त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला सूचना देऊन (ता.19) कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आंतरगाव गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 
Top