धाराशिव (प्रतिनिधी)-  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तीचा व अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील, अपर पोलीस अधीक्षक अफशत आमना यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये दिवंगत स्वातंत्र्य सैनिक शरणप्पा रेवण्णा बेडजिरगे यांच्या पत्नी महादेवी बेडजिरगे, 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक धाराशिव जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह विशेष कामगिरीबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधिक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, शिक्षण विभागातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व केंद्रीय शाळा कसबे तडवळे येथील मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी, वार्षिक मुल्यांकनामध्ये राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.स्मिता सरोदे-गवळी यांना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांना सन्मानित करण्यात आले. आदीसह अनेकांचा सन्मान करण्यात आला.

 
Top