परंडा(प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदना नुसार परंडा येथे शुक्रवार दि.२ मे २०२५ रोजी दिव्यांगाची

तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये 21 दिव्यांगाची तपासण्या करण्यात आल्या आहेत. 

यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी,  उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने  हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला. या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग ,मतिमंद दिव्यांग,  अंध अशा एकूण २१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिव्यांगाचे तपासणी करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी, डॉ.सुहास शिंदे, डॉ.कृष्णा स्वामी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, उत्तम शिंदे, शहर प्रमुख गोरख देशमाने उपरुग्णालय एक्सरे विभाग बापू खताळ ,भराटे आदीसह  कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 
Top