भूम (प्रतिनिधी)- कुंथलगिरी रोडवरील गजानन महाराज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या सभागृहाच्या स्लॅब भरण्याच्या कामाचे उद्घाटन (ता 12 ) रोजी व्यापारी पतसंस्थेचे सचिव दीपक खराडे यांच्या हस्ते करण्यात आले .या दुसऱ्या मधल्या साठी भाविकांच्या देणगी मधून व गजानन महाराज व्यापारी मंडळाच्या सहकार्यातून हे काम होत आहे. या ठिकाणी शेगाव ते पंढरपूर जाणारी पालखी .माघारी जात असताना भूम येथील गजानन महाराज मंदिरामध्ये विसावते. या ठिकाणी या दुसऱ्या मजल्याच्या सभागृहाची काम झाल्यानंतर या पालखी साठी याचा उपयोग होणार आहे. यावेळी दिलीप गाढवे,अरुण देशमुख,जयंत मैदर्गे,अंबादास वरवडे ,अतुल डिसले,प्रकाश मोरे ,संजय साबळे आदी यावेळी उपस्थित होते.