भूम (प्रतिनिधी)- शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धाराशिव जिल्हाप्रमुख भूम तालुक्यातील पांडुरंग धस यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक, माजी आरोग्यमंत्री आ.प्रा डॉ तानाजी सावंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या जिल्हाप्रमुखपदी पांडुरंग धस यांची निवड करण्यात आली. धस यांना कार्याध्यक्ष रामहरी राऊत व संपर्कप्रमुख सचिन मांजरे पाटील,यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह भूम या ठिकाणी पत्र देण्यात आले.

पांडुरंग धस यांनी यापूर्वी वैद्यकीय कक्ष भूम तालुकाप्रमुख या पदावर प्रभावी काम केले आहे. याच कामाची दखल घेऊन आता त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पद ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 


 
Top