धाराशिव (प्रतिनिधी)- शासनमान्य विद्युत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे जिल्हाभरातील विद्युत ठेकेदार व कामगारांमधून स्वागत होत आहे.

धाराशिव येथे बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये शासनमान्य विद्युत ठेकेदार यांची नवीन कार्यकारणी घोषीत करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विशाल शिंगाडे, उपाध्यक्ष शंकर कोळगे, कार्याध्यक्ष नानासाहेब देवकर,  सचिव राजाभाऊ पांचाळ, सहसचिव संदीप रोकडे, कोषाध्यक्ष अतुल टेकाळे,  तुळजापूर विभाग प्रमुख - बापूसाहेब घोंगते, सोशल मीडिया प्रमुख शुभम कुंभार, लोहारा/उमरगा तालुकाध्यक्ष महेश जाधव, भूम तालुकाध्यक्ष परमेश्वर नाईकनवरे, कळंब तालुकाध्यक्ष विशाल जाधवर आणि वाशी तालुकाध्यक्षपदी किशोर ढेंगळे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीचे सर्व विद्युत ठेकेदार व सदस्यांनी स्वागत केले आहे.

 
Top