धाराशिव (प्रतिनिधी)- बारावी परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या निकालामध्ये लातूर उच्च माध्यमिक बोर्डात लातूर पॅर्टनला मागे टाकत, धाराशिव जिल्ह्याने बाजी मारली आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 92.32 टक्के लागला आहे. तर लातूर जिल्ह्याचा निकाल 86.68 टक्के लागल आहे. नांदेडचा निकाल 90.82 टक्के लागला आहे.
लातूर उच्च माध्यमिक बोर्डात लातूर, धाराशिव, नांदेड या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. बारावीच्या परिक्षेसाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लातूरला 10 वी व 12 वीच्या शिक्षणासाठी जात होते. राज्यात लातूर पॅर्टन म्हणून शिक्षण क्षेत्रात लातूरचे नाव गाजले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी लातूरला शिक्षणासाठी येत आहेत. यावर्षी लागलेल्या बारावीच्या निकालामध्ये हा लातूर पॅर्टन 3 नंबरवर राहिला आहे. धाराशिव जिल्हा बारावी परिक्षेच्या निकालात पहिल्या नंबर आहे. तर नांदेड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुलींनी मारली बाजी
धाराशिव जिल्ह्यात बारावी परिक्षेसाठी 15 हजार 582 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 15 हजार 318 विद्यार्थी परिक्षेस बसले. यातील 14 हजार 142 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही उत्तीर्णमध्ये मुलापेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. 7 हजार 289 मुली उत्तीर्ण झाल्या. 6 हजार 873 मुले उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 97.90 टक्के लागला आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल 93.64 टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल 85.16 टक्के लागला आहे. तर व्होकेशनलचा निकाल 90.67 टक्के लागला आहे.
धाराशिव जिल्ह्यात तालुक्यावाजी निकाल याप्रमाणे लागला आहे. कळंब- 94.20 टक्के, तुळजापूर- 93.69 टक्के, भूम 96.51 टक्के, वाशी 93.45 टक्के, धाराशिव 92.56 टक्के, लोहारा 92.59 टक्के, उमरगा 92.14 टक्के, परंडा 84.44 टक्के निकाल लागला आहे.