तेर (प्रतिनिधी)- पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा तेर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पुरस्कारासाठी धाराशिव तालुक्यातून पात्र ठरली असून शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावून बक्षिसाची मानकरी ठरली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये भाग घेत तेरच्या पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेने मूल्यांकनामध्ये सरस गुण मिळवून पुरस्कारासाठी प्रयत्न केले होते. शाळेच्या या प्रयत्नास यश मिळाले असून तालुकास्तरावर सदर शाळा तृतीय क्रमांकावर स्थान प्राप्त करून पुरस्काराची मानकरी ठरली. पुरस्काराच्या रकमेचा एक लाख रुपयांचा धनादेश गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार अहेमद यांच्या हस्ते प्राप्त झाले. यावेळी विस्तार अधिकार बापू शिंदे, केंद्रप्रमुख सय्यद खमरोद्दिन आणि वरिष्ठ लिपिक ताडकर उपस्थित होते. या पुरस्कारासाठी तेर बीटचे विस्तार अधिकारी तोडकर तसेच केंद्रप्रमुख पडवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर पुरस्कारासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी खूप सहकार्य केले. मुख्याध्यापक शहा तय्यबअली पुरस्कारासाठी शेख अर्शिया, खतीब मुमताज, फुलमामडी तौफिकुलआलम आणि मौला यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन केले जात आहे. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या जात आहेत. मुख्याध्यापक शहा तय्यबअली यांनी पुढील वर्षात जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी प्रयत्न करून शाळेचा दर्जा उंचावण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.