भूम (प्रतिनिधी)- एकनाथ महाराज पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम संबंधित कंट्रक्शन कंपनी मनमानी कारभार करत असून, गावांतर्गत बस स्टॅन्ड असल्यामुळे नेहमीच गर्दी असते. अरुंद रस्ता केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. रुंदी दोन मीटरने कमी करण्यात आहे. नऊ मीटरचा रस्ता करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे.

एकनाथ महाराज पालखी रस्त्याचे काम भूम तालुक्यातील आंतरवाली,तिंत्रज, दांडेगाव, देवगाव, जेकटेवाडी, ताकमोडवाडी या गावांमधून जात आहे. गावांतर्गत बस स्टॅन्ड असताना गर्दीमध्ये अरुंद रस्ता केल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आंतरवाली गावाकडून रुंदीप्रमाणे आलेला रस्ता तिंत्रज येथे त्याच रुंदीने रस्ता नाल्याचे काम चालू आहे. डांबरीला चिटकून नाली घेण्यात आलेले आहे. सिमेंट रस्त्याच्या दोन साईट पट्ट्या होऊ शकत नाही. असे असताना भविष्यात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावामध्ये रस्त्याची पाहणी करण्यात यावी. पाठीमागे जसा रस्ता आलेला आहे तसा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. जेणेकरून भविष्यात अपघात घडणार नाहीत. सदरील रस्ता नऊ मीटरचा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी दत्तात्रय गायकवाड ,सुरेश शिंदे, तुषार मुरूमकर, मनोहर साबळे, सुग्रीव धुमाळ, भिकू साबळे, दत्तू पवार,ज्ञानदेव मुरूमकर, कोंडीबा साबळे, गोरख साबळे, अश्रू चौगुले, सुनील साबळे, त्रिंबक थोरात,उद्धव लांडे ,सुरज गायकवाड ,बजरंग धुमाळ ,गणेश लांडे आदी उपस्थित होते.



एकनाथ महाराज पालखी मार्गाचे काम सध्या तालुक्यातील अंतरवली, तिंत्रज,दांडेगाव, देवगाव, जेकटेवाडी, टाकळवाडी या गावातून जात आहे. परंतु हा रस्ता दोन मीटरने कमी करण्यात येत आहे. जर हा रस्ता नऊ मीटरचा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

दत्तात्रय गायकवाड

माजी जिल्हा परिषद सदस्य.


 
Top