धाराशिव (प्रतिनिधी)- कुळाचे नाव कमी करण्यासाठी 5 हजार रूपयेची लाचेची मागणी करून 4 हजार रूपये स्विकारताना तलाठी भूषण वशिष्ठ चोबे व खाजगी लिपीक भारत शंकर मगर यास धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार यांचे वडिलांचे नावे असलेल्या शेत गट न. 15/10 मधील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तहसिल कार्यालय, धाराशीव येथे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरुन तहसिलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना अर्जदार यांचे अर्जावरुन स्थळपाहणी करुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यावरून तक्रारदार यांचे शेताची स्थळ पाहणी करुन पंचनामा करुन स्थळ पाहणी अहवाल मंडळ अधिकारी यांचे मार्फतीने तहसिलदार यांना सादर करण्यासाठी तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर हे तक्रारदार यांचेकडे 5 हजार रुपये लाच मागणी करत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती.


तक्रारीची पडताळणी-

तक्रारदार यांनी दिनांक 05 मे 2025 रोजी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ला. प्र. वि. धाराशीव येथे तक्रार दिली होती. त्यावरून आज रोजी तलाठी कार्यालय, वाघोली धाराशिव येथे आरोपीचे कार्यालयात पडताळणी केली असता आरोपी तलाठी भूषण चोबे याने तक्रारदार यांचे वडिलांचे अर्जावरुन स्थळपाहणी करुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्यासाठी खाजगी लिपीक भारत मगर यांचे मार्फतीने पंचासमक्ष  5 हजार रुपयेची लाच मागणी करुन तडजोडीअंती 4 हजार रूपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि धाराशीव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील, नागेश शेरकर यांनी ही कारवाई केली आहे.


 
Top