तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 2024- 25 चा बारावी परीक्षेचा निकाल प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला आहे.
शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील एचएससी परीक्षेत एकूण 30 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. गिरी प्रद्युम्न कमलाकर -83.83 टक्के, रुपनर हर्षद सुरेश-77.33 टक्के, सुरवसे मंथन धनंजय-76.33 टक्के, 30 विद्यार्थ्यापैकी- विशेष प्राविण्य-04, प्रथम श्रेणी-15, द्वितीय श्रेणी-11 बारावी परीक्षेत सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा जिल्हाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार, आमदार राणाजगजी सिंह पाटील, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे सैनिक स्कूलचे कमांडंट कर्नल मकरंद देशमुख व विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके इत्यादींनी
सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.