धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 66 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण बालचमूने केले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के.टी. पाटील सरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला . नवनीत चित्रकला स्पर्धेत जिल्हयात अनुक्रमे पहिली आलेली पलाशा संजय नलावडे, शिवन्या चव्हाण द्वितीय तर योगिता किरण गरड तृतीय आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, नवनीत  चित्रकला उपयुक्त साहित्य देऊन सत्कारीत करण्यात आले. या स्पर्धकांना चित्रकला शिक्षक शेषनाथ वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य नन्नवरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र दिनाचा इतिहास विदयार्थ्यासमोर मांडला. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, तसेच सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, निखिल कुमार गोरे, धनंजय देशमुख, मोहन शिंदे, विनोद आंबेवाडीकर तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले तर वंदे मातरम्‌‍ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी सर्व विदयार्थ्यांना निकालपत्रक वाटप करण्यात आले.

 
Top