तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरमध्ये रविवार दि.25 मे रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून बुधवार दि.21 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात संयोजन समितीची बैठक घेऊन मराठा समाज वधु -वर मेळाव्या संदर्भात भोजन व्यवस्था,नोंदणी कक्ष, प्रमुख पाहुणे, सत्कार मुर्ती,मार्गदर्शक, बैठक व्यवस्था,नियोजन आदी विषयांवर अंतिम आढावा घेण्यात आला.
आतापर्यंत मोठ्या संख्येने वधू-वरांची कच्ची नोंदणी झालेली आहे. तुळजापूरात होत असलेला या मेळाव्यासाठी नाव नोंदणी पूर्णतः निःशुल्क ठेवण्यात आली असून दुरवरच्या वधू-वरांच्या पालकांनी व्हाट्सअप माध्यमांचा उपयोग करून संयोजन समितीमधील सर्व पदाधिकाऱ्यांकडे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, गुलबर्गा, बिदर, लातूर,आटपाडी, सिंदूदुर्ग आदी ठिकाणांहून वधु -वर पालकांनी आपले परिचय पत्र पाठवून कच्ची नोंदणी करुन घेतली आहे.
संपूर्ण राज्यातून या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या परिचय पत्रावरुन पालक उत्स्फूर्तपणे या मेळाव्यात सहभागी होण्यास इच्छूक असल्याचे निदर्शनास येत आहे. या मेळाव्यासाठी जवळपास तीन ते चार हजार वधु-वर सहभागी होतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. हा मेळावा रविवार दि.25 मे रोजी तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव, वधू-वर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या बैठकीस संयोजन समितीमधील गणेश पुजारी प्रा. अभिमान हंगरगेकर,अशोक गायकवाड,उमाजी गायकवाड, उत्तम अमृतराव, नागनाथ भांजी,चंद्रकांत भांजी,अमोल निंबाळकर अण्णासाहेब कदम,नवनाथ पवार,राजू तांबे,अशोक ठोंबळ, संजय शिंदे,दत्तात्रय घाडगे, अशोक चव्हाण,लखन मुंडे, कमलाकर मुंडे,अर्जुन जाधव, सुहास साळुंके,हनुमंत भालेकर, गोरोबा लोंढे,राहुल जाधव,राम मुंडे,रमेश भोसले,विश्वास मोटे प्रा डॉ.टी.आर.बारबोले,राजेंद्र कदम,रमाकांत लोंढे आदी सदस्य उपस्थित होते.