तुळजापूर (प्रतिनिधी)- डॉ. गोविंद काळे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे असलेल्या पुराव्यानुसार तुळजापूरचे 16 आणे भोपे पुजारी, पाळीकर भोपे पुजारी, उपाध्ये भोपे पुजारी हे “भोपे” आहेत. तसेच सन 1328 फसलीची यादी ही शासकिय पुरावा आहे त्यास मंदिर संस्थान व जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही यादी ग्राहय्य धरुन “भोपे” प्रमाणपत्र व भोपे जात पडताळणी करण्यात यावी अशी सुचना केली.

त्यावेळी प्रकाश अहिरराव, अध्यक्ष जातपडताळणी धाराशिव, बलभिम शिंदे उपायुक्त तथा सदस्य आणि श्रीमती अरुणा गायकवाड यांनी यादीतील व्यक्तीनी कोर्टातुन वारसा हक्क प्रमाणपत्र सादर केल्यास “भोपे” प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी करुण्या येईल त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. तसेच दिनांक 01/04/2024 ते 31/03/2025 या कालावधित “भोपे” जात प्रमाणपत्राचे 51 अर्ज दाखल होते त्यापैकी 45 जात प्रमाणपत्र वैद्य ठरविण्यात आली 6 प्रकरणे वंशावळ व इतर पुराव्यामुळे प्रलंबित आहेत असे बलभिम शिंदे यांनी सांगीतले. श्री तुळजाभवानी पुजारी मंडळास महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा दिनांक 09/05/2025 रोजी धाराशिव दौरा असुन “भोपे” प्रमाणपत्र व जात पडताळणी बाबत चर्चा करण्यास बी. जी. अरवत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण धाराशिव येथे उपस्थित राहण्याबाबत पत्र क्र. 741 दिनांक 06/05/2025 देण्यात आले त्या नुसार पुजारी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग पुणे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राज्यमागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ. मारुती शिकारे, जात

पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश अहिरराव, बलभिम शिंदे उपायुक्त तथा सदस्य, श्रीमती अरुणा गायकवाड उपविभागीय अधिकारी धाराशिव उपस्थित होते.

या निवेदनावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पुजारी मंडळाच्या वतीने प्रा. धनंजय लोंढे, नागेश साळुंके यांनी “भोपे” संदर्भातील सर्व पुरावे सादर करुन सन 1328 फसलीची मुळ यादी ग्राहय्य धरुन “भोपे” प्रमाणपत्र व जात पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली. सदर निवेदनासोबत “भोपे” सबंधी गोविंद कालेकर यांचे भारतीय संस्कृतीक कोष खंड- 6, डॉ. गोविंद काळे लेखक यांचे मुंबई इलाख्यातील जाती, भाडे कमीशन रिपोर्ट, के. एस. सिंग यांचे People of India National Seris Volwo-4 - Communities of India   हे पुरावे जोडण्यात आली. तसेच सर्व पुराव्या अधारे आयोगाने राज्य विधिमंडळाकडे शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर विपीन शिंदे उपाध्यक्ष, प्रा. धनंजय लोंढे, नागेश साळुंके यांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले.

 
Top