धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान 2025 अंतर्गत राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर 12 मे 2025 रोजी सोलापूर येथे झालेल्या विभागीय मेळाव्यात, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या शुभहस्ते तथा उपक्रम प्रमुख महेश बडे,निरीक्षक मंगेश ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मयुर काकडे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक व लोकहितासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. आपल्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणं, प्रशासनासमोर प्रश्न मांडणे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम रस्त्यावर उतरून लढणे या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना मयुर काकडे यांनी सांगितले, “हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना, माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराला, संघटनेतील माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला, आणि माझ्यावर सदैव कृपा असणाऱ्या शिवबाबाच्या आशीर्वादाला समर्पित करतो. बच्चुभाऊंची प्रेरणा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे.“हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून, समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.
पुरस्कार स्वीकारतेवेळी मयुर काकडे यांच्यासमवेत बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, महेश माळी, महादेव चोपदार, संजय शिंदे, रवी शित्रे, संजय नाईकवाडी, दिनेश पोतदार,नवनाथ कचार, अनिल महबोले तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.