उमरगा(प्रतिनिधी)- लोहारा तालुक्यातील भातागळी येथे शंभू महादेव यात्रेनिमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बालगट मोठा गट आणि मुलींसाठी लावणी या गटात स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक समस्त ग्रामस्थ भातागळीकर यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील भातगळी येथील शंभू महादेव देवस्थान प्रसिद्ध आहे. दरवर्षी यात्रेनिमित्त भव्य अशा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी शंभू महादेव यात्रा महोत्सव भातागळी फेस्टिवलचे आयोजन 15 व 16 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्रशाला भातागळी येथे सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.
या भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये बाल गट, मोठा गट, लावणी मुलीसाठी या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. या महोत्सवात बालगट वैयक्तिक स्पर्धा मंगळवार 15 एप्रिल रोजी होणार आहे. बालगट प्रथम पारितोषिक 7000 रू (अजिंक्य बाबा पाटील) द्वितीय पारितोषिक 5000 रु ( भातागळीकर ज्वेलर्स) तृतीय पारितोषिक 3000 रू (विक्रम जगताप) यांच्या कडून दिले जाणार आहे.
बालगट समूह नृत्य स्पर्धा ही मंगळवार 15 एप्रिल रोजी होणार आहे.बालगट समूह नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक 11000 रू (सुलतान शेट) द्वितीय पारितोषिक 7000 रु (आ.कैलास पाटील) तृतीय पारितोषिक 5000 रू (आ.कैलास पाटील. ) यांच्या कडून दिले जाणार आहे.
मोठा गट वैयक्तिक नृत्य स्पर्धा ही बुधवार 16 एप्रिल रोजी होणार आहे. मोठा गट वैयक्तिक मध्ये प्रथम पारितोषिक 11000 रू (आ.प्रवीण स्वामी) द्वितीय पारितोषिक 7000 रु (संजय पवार) तृतीय पारितोषिक 5000 रू तन्वी गर्ल्स हॉस्टेल ) यांच्या कडून दिले जाणार आहे.
प्रौढ गट समूह नृत्य स्पर्धा ही बुधवार 16 एप्रिल रोजी होणार आहे. प्रौढ गट समूह नृत्य मध्येप्रथम पारितोषिक 21000 रू (आ.प्रवीण स्वामी) द्वितीय पारितोषिक 15000 रु (डॉ.प्रतापसिंह पाटील) तृतीय पारितोषिक 11000 रू (सचिन ज्वेलर्स लोहारा ) यांच्या कडून दिले जाणार आहे. मुलींसाठी आयोजित केलेली लावणी स्पर्धा ही 15 व 16 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.या लावणी स्पर्धेमध्ये नृत्य मध्ये प्रथम पारितोषिक 11000 रू (सलीम गनी शेख) द्वितीय पारितोषिक 9000 रु (मेहबूब पाशा गनी शेख ) तृतीय पारितोषिक 7000 रू (मुशरान गनी शेख) तर चतुर्थ पारितोषिक 5000 रू ( दिलीप पोटरे )यांच्या कडून दिले जाणार आहे.
ही स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. समूह नृत्य दोन्ही गटांसाठी नृत्कांची प्रत्येकांची संख्या सहा पेक्षा जास्त नसावी. समूह नृत्य दोन्ही गटांसाठी वेळ दहा मिनिटे असणार आहे. वैयक्तिक नृत्यासाठी सात मिनिटे वेळ असणार आहे. स्पर्धकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे.
बाल गट वैयक्तिक आणि समूह , मोठा गट वैयक्तिक साठी 251 रु, वैयक्तिक लावणी आणि प्रौढ गटासाठी 301 रू प्रवेश फी आकारण्यात आली आहे. तर प्रवेशिका या 14 एप्रिल 2025 पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. आलेल्या स्पर्धकांसाठी भोजन व्यवस्था मा.अनिल जगताप आणि आबा फत्तेपुरे यांनी केली आहे.या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक समस्त ग्रामस्थ भातागळीकर यांनी केले आहे.