धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापर येथील ड्रग्ज प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायायाने फेटाळला. त्यामुळे अत्यांना आता उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज करणे किंवा पोलिसांना शरण जाण्याचा पर्याय आहे. 

प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. 22 आरोपी फरार आहेत. त्यापैकी काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी धाराशिवच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यापैकी तुळजापूरात वास्तव्य असलेला स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग व नळदुर्ग येथील इंद्रजीत उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर यांनी अटकपूर्व जामीनासाठी धाराशिव सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अर्जावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे आरोपींना अटकपूर्व जामीन दिला तर अन्य फरार आरोपींनाही फायदा होवू शकतो. संवेदनशील प्रकरणातील तपासात अडथळे येवू शकतात. असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळले आहेत. 


 
Top