धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे आंबेवाडी ता. जि. धाराशिव येथील समाज मंदिरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून सार्वजनिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेवाडी येथील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रयावर भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,गावचे सरपंच पांडुरंग सुतार,पोलीस पाटील भैरव दरेकर,पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब कदम, माजी सरपंच नवनाथ क्षीरसागर, कल्याण जाधव,पांडुरंग दरेकर,हनुमंत क्षीरसागर,डी बी राऊत गौतमा आंबेवाडीकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राऊत,सौदागर राऊत, संतोष राऊत,दादा राऊत,आबा राऊत, यशवंतराव,लिंबा राऊत देविदास राऊत यांच्यासह महिला मंडळ यांनी पुष्प वाहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

 
Top