भुम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरसोली येथे जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ दिनांक १५ रोजी झाला. गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘‘गुणगौरव समारंभ हा विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि बळ देत असतो. त्यामुळे असे समारंभ होणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारून स्वत:ला घडवावे आणि देश विकासात योगदान द्यावे.’’
पोलीस सहाय्यक निरीक्षक म्हणाले, ‘‘गुणवत्तेत सातत्य राखणे महत्वाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहून वाचन, मनन करून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करावा आणि जीवनात पुढे जावे.’’
दरम्यान इंटरनॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात प्रथम, द्वितीय रँक मध्ये, नवोदय परीक्षेत पात्र विद्यार्थी, संस्कृतीक कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद सरोदे, विस्तार अधिकारी सोमनाथ टाकले, सूर्यकांत साळुंखे, केंद्र प्रमुख भास्कर चव्हाण, सरपंच सुशीलाताई पाटिल,प्रा. राम चंदनशिवे, मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, शाळा समिती अध्यक्ष राजकिरण गोयकर, मा. सरपंच प्रशांत मुंडेकर, उपाध्यक्ष अमोल खराडे, भागवत गोयकर, शिक्षक जिवन आगळे, तात्या ढोरे, अमोल कोल्हाळे, राजाभाऊ काळे, अय्युब तांबोळी, रोहित चंदनशिवे, शिक्षिका कल्पना घेवारे, सारजा सुरवसे सह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम थाटे यांनी केले. यावेळी या प्रशालेतील शिक्षक श्री जीवन आगळे यांनी याप्रशालेतुन नवोदय परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार रुपयांच्या पुस्तकाचा सेट भेट दिला