धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्ममान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. डॉ.शेटे हे 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून बिदर एक्सप्रेसने धाराशिवकडे प्रयाण करतील.
17 एप्रिल रोजी सकाळी 3 वाजता धाराशिव रेल्वे स्टेशन येथे आगमन व विश्रामगृहाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक.1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेल्या एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक तसेच आयुष्यमान भारत कार्ड वितरणाबाबत बैठक घेतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील.