भुम प्रतिनिधी)-जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संचलित बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज) मध्ये संकुल संचालक मा.श्री.ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून विविध समाजसुधारक व त्यांचे कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी त्यांच्या जयंती व पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात त्यानुसार महाविद्यालयात आज 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रणजित शिराळ सर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण व श्रीफळ फोडून पूजा संपन्न झाली. या प्रसंगी प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजासाठी असलेले योगदान याबद्दल थोडक्यात माहिती दिली , यावेळी उपस्थितांनी आपल्या शब्दात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.