तुळजापूर (प्रतिनिधी) -  महाराष्ट्रात तिर्थक्षेञ तुळजापूरची बदनामी झाली याला जबाबदार कोण? असा सवाल करुन आम्हाला राजकिय व्यक्तीमत्व नाही तर ड्रग्ज संपावायाचे आहे. खासदारांवर बेछुट आरोप करणे आम्ही खपवुन घेणार नाही. असा इशारा महाविकास आघाडीचे युवा नेते रुषी मगर यांनी पञकार परिषद घेवुन दिला. 

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांनी ड्रग्ज प्रकरणी पञकार परिषद घेवुन खासदारसह महाविकास आघाडी नेत्यांवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे रुषी मगर, अमोल कुतवळ, सुधीर कदम, उत्तम अमृतराव, शाम पवार सह अनेक  पदाधिकाऱ्यांनी या पञकार परिषदेत आरोपाला उत्तर दिले. 

रुषी मगर म्हणाले कि, भाजप आमदाराचे कार्यकर्त्यांनी खासदार, आमदार यांच्यावर  बेछुट आरोप केले. पुढील पिढी व्यसनाधीन होवु नये यासाठी महाविकास आघाडी येथे लढतेय. खासदार व पालकमंञी यांनी ड्रग्ज विरोधात विशेष आवाज उठवला.  आम्ही आमदाराचा कधीही ऐकरी उल्लेख करीत नाही. कारण ते आमच्यावर संस्कार नाही. खासदारचा अपमान म्हणजे लोकसभा मतदार संघाचा अपमान आहे. खासदारांची भूमिका ही कुणाला अडकावयाची नाही, ना कुणाला बदनाम करावयाची पण नाही. 

आमदार महोदयांनी दोन वर्षा पुर्वीच ही भूमिका घेतली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.  सहा आमदारांना पुरुन उरलेला खासदार आहे. मुंबईचे ड्रग्ज लोन तिर्थक्षेञ तुळजापूरात पोहचले. खासदार व पालकमंञी यांनी ड्रग्ज विरोधात विशेष आवाज उठवला. त्यांचे विशेष आभार. सगळ्यांनी मिळुन तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज मुक्तसाठी काम करु असे शेवटी म्हणाले. यावेळी नागनाथ भांजी, अमर परमेश्वर, महेश चोपदार, राहुल खपले, अजय सांळुके यांनी ही पञकार परिषदेस संबोधित केले.

 
Top