धाराशिव (प्रतिनिधी)- फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानवाचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दि.07 एप्रिल, दि.11 एप्रिल ते दि.14 एप्रिल पर्यंत विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
यात स्वच्छता अभियान, शासकीय योजनांचा मेळावा,आरोग्य शिबीर,गुणवंतांचा सत्कार,जयभीम पदयात्रेतील सहभाग, भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिकाची प्रत व विश्लेषण पत्रक वाटप,समितीच्या आकर्षक अशा देखाव्याची पाहणी करून पदयात्रेचा समारोप, समाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक समता सप्ताह मध्ये सहभाग,भीमजी ॲटो रिक्षा युनियन रॅलीचा भारतीय संविधान उद्देशिकाची प्रत,विश्लेषण पत्रक आणि पुष्प बुके देऊन स्वागत समारोप समारंभ व युनियनच्या वतीने नाश्ता,दि.14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन,रक्तदान शिबीर घेण्यात आले,सकाळी 11 ते रात्री 11:30 पर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. राजगीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने निराधार व गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आकर्षक अशा देखाव्या मध्ये संभाजीनगर येथील विद्यापीठाची कमान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म वेळप्रसंगी कुटी (झोपडी) ज्यामध्ये माता भीमाई व बाळ भीमराव हातात पुस्तक घेऊन वाचन करतांना, भारताचा कोहिनूर हिरा ज्यामध्ये भारताचा नकाशा व त्यावरती कोहिनूर हिरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, महाड येथील चवदार तळे पाण्याचा सत्याग्रह, दिक्षा भुमी,तथागत गौतम बुद्ध यांची भुमीस्पर्श सुंदर अशी मुर्ती,भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान ग्रंथ देतांना व भारतीय संविधान उद्देशिका प्रत,शितल छाया देणा-या चंद्रामध्ये शांतीदुत तथागत गौतम बुद्ध,अशा देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या जयंती महोत्सवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सीईओ मैनाक घोष, आरडिसी शोभा जाधव, प्र.आरडिसी संतोष राऊत, मुख्याधिकारी वसुधा फड, क्रिडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, इतिहासकार रविंद्र शिंदे, दलित मित्र शंकर खुने, सुधाकर माळाळे,सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र धावारे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश चव्हाण,तहसिलदार मृणाल जाधव,मित्र संस्थाचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, विश्वास शिंदे,युवराज नळे,नितिन काळे,अभय इंगळे,कानिफनाथ देवकुळे,खलिल सय्यद,आशिष मोदानी,मैन्नोद्दिन पठाण,प्रशांत पाटील,सिध्दार्थ बनसोडे,धनंजय राऊत,अग्निवेश शिंदे,देवानंद एडके,विधीज्ञ मंडळ धाराशिवचे अध्यक्ष ऍड.अमोल वरुडकर व सर्व विधिज्ञ मंडळ,पर्यटन विकास समिती,तसेच फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,मार्गदर्शक सदस्य धनंजय वाघमारे,संपतराव शिंदे,बलभीम कांबळे,डॉ.रमेश कांबळे, बाबासाहेब गुळीग,अतुल लष्करे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे श्रीकांत गायकवाड,नितीन गजधने,सोहन बनसोडे,मुकेश मोटे,अमोल लष्करे,आदिनाथ सरवदे, आशाताई कांबळे,ऍड.ज्योती बेडेकर,ऍड.अरुणा गवई, अस्मिता कांबळे,वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक गांधले,किर्तनातुन समाज प्रबोधन करणारे तानाजी भोईटे महाराज,शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णु इंगळे,डॉ बाबासाहेब आंबेडकर विचामंचचे प्रा.रवि सुरवसे,म.ज्योतिबा फुले जयंती मंडळाचे अध्यक्ष महादेव माळी,पोलीस मतदार जनजागरण समितीचे सचिन चौधरी,गोंधळी संघटनेचे बांधव सतिश लोंढे,लहुजी शक्ती सेनेचे संतोष मोरे,म.बसवेश्वर जयंती मंडळाचे महेश उपासे,लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती मंडळाचे दत्ता पेठे,ग्राम विकास संस्थेचे युसुफ सय्यद,शुभम मराठे,राजीव यावलकर,विवेक सारंग,युवा भीम सेनेचे महादेव भोसले,अन्य इतर उपस्थित होते.