धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे रायगड येथे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून निवड झाल्याबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार माननीय आदरणीय राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मा.नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे,लाटे सर, डॉ. दिगंबर दाते, डॉ. उषा वडणे, डॉ. प्रीती माने, डॉ. गुरुप्रसाद चिवटे, प्रा. शितल पवार, प्रा.प्रदीप पवार, प्रा. ज्ञानराज निंबाळकर, डॉ. राजेश नन्नवरे, डॉ. राजश्री यादव प्रा. रफिक शेख, श्री आर.एल.मुंडे उपस्थित होते.
डॉ. विक्रमसिंह व्ही. माने हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्राचार्य कार्यरत आहेत.त्यांचे 35 हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्स, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून सात वर्षाहून अधिक काळ काम पहिले असून,त्यांनी कंपन्यांच्या 100 हून अधिक भरती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे; तसेच टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, जस्ट इंजिनिअरिंग, प्रिसिझ एम्प्लॉयबिलिटी स्किल्स, राधे इंजीनियरिंग यांसारख्या विविध कंपन्यांसाठी 2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे (सॉफ्ट आणि टेक्निकल स्किल्स) आयोजन केले आहे आणि त्यांच्या कार्यकाळात 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना अद्ययावत/नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. ते अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे औद्योगिक प्रशिक्षण, सल्लामसलत, संशोधन आणि विकास कार्यांसाठी उद्योग संस्था संवादामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून ते महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट () शी तज्ञ वक्ता म्हणून जोडलेले आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी 1000 हून अधिक प्राध्यापकांसाठी प्राध्यापक विकास कार्यक्रम, औद्योगिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्यांनी मॅथवर्क्स- ऑनलाइन मशीन लर्निंग, डेटा प्रोसेसिंग आणि व्हिज्युअलायझेशन, कोर्सरा, ऑटोकॅड , सिस्को, नेटवर्किंग, टीसीएस आयओएन,एन.पी.टी. ई. एल. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड च्या माध्यमातून पायथॉन प्रोग्रामिंग,वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स आणि यांसारख्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यलयातील तज्ञ प्राध्यापनकांच्या मदतीने पूर्ण केले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कास्टिंग कास्टिंग निर्मिती करणाऱ्या उद्योगांना कास्टिंग मधील डिफेक्ट चे प्रमाण 70% पेक्षा कमी झाले आहे.त्यामुळे त्यांना साठाव्या इंडियन फाउंड्री काँग्रेस बंगलोर येथे सर्व उत्कृष्ट प्रबंध या पुरस्काराने प्रमाणित केले होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाखा प्रमाणे महाराष्ट्रीयन चॅलेंज कडून उद्योग निर्मितीसाठी बीज भांडवल उभे करून दिले आहे त्यामुळे विद्यार्थी स्तरावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योग निर्मितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्याचबरोबर डॉ बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे यांच्याकडून त्यांना अविष्कार स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप एक्सलन्स हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले होते.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा तुळजापूर विधानसभेचे आमदार माननीय आदरणीय राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांनी तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र,तेरणा कृषी ड्रोन ट्रेनिंग सेंटर, तेरणा रेडिओ सेंटर व आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.
त्यांची एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त मल्हारदादा पाटील, बाळासाहेब वाघ,उद्योजक ,कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.