धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने खो-खो या खेळामध्ये कायमच दबदबा राखला आहे. या खेळातले सर्वच पुरस्कार प्राप्त करणारी ही एकमेव शाळा आहे. अनेक खेळाडू हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून त्यांना घडविणारे प्रशिक्षक प्रविण बागल यांना सन 2023 - 24 चा राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच शिवछत्रपती खेळाडू गौरी राजेश शिंदे यांना बहाल करण्यात आला.
त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते क्रीडा शिक्षक प्रविण बागल तसेच गौरी राजेश शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षांनी आपल्या भाषणात कला, क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता यात संस्था कायम आघाडीवर असून ही घौडदौड कायम ठेवण्यासाठी संस्था नेहमीच आपल्या पाठीशी तनमनधनाने उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थासदस्य संतोष कुलकर्णी, युवा उदयोजक अभिराम पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे , राजेंद्र जाधव , निखिल कुमार गोरे, धनंजय देशमुख, श्रीमती बी.बी. गुंड, मोहनराव शिंदे, डॉ.विनोद आंबेवाडीकर, मनोज कोल्हे तसेच इ. 5 वी ते 12 वीचे सर्व शिक्षक, शिक्षीका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गौरी शिंदे हिचे पालक राजेश शिंदे व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.