भूम (प्रतिनिधी)- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी येथील भीम नगर पेठ भूम येथे प्रज्ञा- करुणा बुद्धविहाराच्या प्रांगणात सकाळी पूजापाठ वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा नेते प्रवीणदादा रणबागुल यांच्या हस्ते करण्यात आले तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून शहरातील नामवंत वकील मंडळी, विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी सैनिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी कमिटीचे अध्यक्ष झुंबर गायकवाड, उपाध्यक्ष कुंदन शिंदे,सचिव आकाश गायकवाड, सचिन शिंदे, महेंद्र गायकवाड, स्वप्निल जानराव, संजय शिंदे यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुकुंद लगाडे यांनी मानले. 


येथील गोलाई चौका मध्ये एसटी स्टँड रिक्षा चालकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पूजापाठ वंचित नेते प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष अमोल वाघमारे, जाकिर पठाण,संदीप जाधव,रवी पोळ, मोहन शिंदे, तुषार शिंदे,संदीप शिंदे, सचिन कोल्हे ,अमोल कोल्हे, अमोल निकाळजे, निलेश वाघमारे, समाधान चौधरी, तात्या जावळे, भाऊ जावळे, सतीश मस्के ,प्रकाश शेटे अफरूज पठाण, अमोल साठे, बबलू देवधरे, लहू वाघमारे अनिल बोराडे, बंडू लोहार, अजय भोसले, बाप्पा वडेकर, रशीद मोमीन, दत्ता रेपाळ, साईनाथ शिंदे, संजय बुरुड, लहू कुंभार, बदक भाई, पिंटू कांबळे, पप्पू बागाडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

येथील साठे नगर,एसटी डेपो, घरात कॉम्प्लेक्स, महावितरण कार्यालय व विविध कार्यालयासह कसबा धाकटीवेस थोरलेवेस,रमाई नगर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले इंदिरानगर येथे देखील अभिवादन करण्यात आले.

 
Top