धाराशिव (प्रतिनिधी )- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प. ) पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष कु.सक्षणा सलगर यांचा धाराशिव येथे वाढदिवस  उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश प्रवक्ता प्रा डॉ.मारुती लोंढे म्हणाले की,  सक्षणाताई सलगर यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच महिलांच्या सबलीकरणावर भर दिलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करावे यासाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत. यापुढे देखील त्यांनी असेच समाज उपयोगी कार्य करीत राहावे व आणि त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी पदे पादाक्रांत करावी. अशाप्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार सौ.संगीता काळे, श्री शशिकांत काळे, सुनील आंधळे, सुमित काळे व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  सदर सत्कारा बद्दल सक्षणा सलगर यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top