कळंब (प्रतिनिधी)- महावितरणच्या गलथान कारभारामुळे खोदंला गाव पुन्हा एकदा आधाराच्या खाईत लोटले आहे. गावकऱ्यांची पाण्यासाठी वन वन भटंकती सुरू झाली आहे.  पंधरा दिवसांपूर्वी वारंवार पाठपुरावा करून सकाळी दुरुस्त करून बसवलेला ट्रान्सफॉर्मर दि. 27 एप्रिल रोजी पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आणि संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला.

सध्या तीव्र उन्हाळ्याचे चटके बसत असताना वीज नसल्याने गावातील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. विहिरी आणि कुपनलिका वीजअभावी पूर्णपणे बंद झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी गावाबाहेर भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर  कामचुकारपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रान्सफॉर्मरची नीट देखभाल न करता फक्त तात्पुरती डागडुजी केल्यामुळेच भीषण आग लागल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.“महावितरणच्या गलथान कारभारावर लगाम घालावा आणि वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा,“ अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 
Top