भूम (प्रतिनिधी)-  भूम कोष्टी समाजातील बोत्रे परिवारातील दोन सख्ख्या बहिणींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत यशस्वी प्रवेश केला असून, त्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. समाजाचे मार्गदर्शक आणि माजी उपनगराध्यक्ष नारायणराव बोत्रे यांच्या पुतणी, तसेच हनुमंतराव बोत्रे यांच्या कन्या गीता सुरेखा हनुमंतराव बोत्रे व शिबीका सुरेखा हनुमंतराव बोत्रे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शुभांगी हनुमंतराव बोत्रे व गीता हनुमंतराव बोत्रे यांच्या महसूल सहाय्यक (मंत्रालय क्लार्क) पदावर निवडी झाली आहे.

भूम शहरातील कपड्यांचे व्यापारी हनुमंत विठ्ठलराव बोत्रे हे शिक्षणापासून दूर असले तरी त्यांच्या तीन मुलींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सरकारी सेवेत प्रवेश केला आहे. त्यांची एक मुलगी राणी श्रीकांत खामकर या जिल्हा न्यायालय, भूम येथे लघुलेखक (वर्ग-2) पदावर कार्यरत आहेत. 


 
Top