तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील येथील  श्री संत गोरोबा काका यांच्या   वार्षिक  यात्रेनिमित्त तेर ग्रामपंचायत व श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या   कुस्ती स्पर्धेत कोंड ता धाराशिव येथील प्रशांत जाधव  यांने मानाची  कुस्ती  जिंकली तर  तेर येथील राहुल शिंदे याने   दुसऱ्या  तर शिराढोण येथील विजय ठोंबरे  तिसऱ्या मानाच्या कुस्तीचे विजेते मानकरी ठरले .

 तेर ग्रामपंचायत व गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या  वतीने कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड , ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, भागवत भक्ते, मारुती इंगळे, रतन नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन करून  कुस्तीच्या आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बापू नाईकवाडी, नवनाथ पसारे, राम कोळी, अजित कदम , किशोर काळे , नामदेव कांबळे, धनंजय आंधळे,  संजय जाधव, शामराव गायके, नानासाहेब भक्ते   आदिंसह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी नागरिक  उपस्थित होते 

 कुस्तीच्या आखाड्यातील शेवटची मानाची कुस्ती 15 हजार रुपयांची  धाराशिव तालुक्यातील कोंड येथील मल्ल पैलवान प्रशांत जाधव  प्रथम विजेता ठरला तर दुसऱ्या 11 हजार रुपये तेर येथील शुभम शिंदे तर तिसऱ्या 7 हजार रुपयांच्या कुस्तीवर शिराढोण येथील विजय ठोंबरे यांनी नाव कोरले. कुस्तीच्या आखाड्यात धाराशिव जिल्ह्यांसह परजिल्ह्यातील 270 लहान, मोठ्या मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दरम्यान आखाड्यात पंच म्हणून  भागवत भक्ते, गोविंद घारगे, मारुती इंगळे, शामराव गायके, संजय जाधव , नानासाहेब भक्ते, नवनाथ पसारे,  यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी कुस्ती स्पर्धा  यशस्वी करण्यासाठी  उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामपंचायत सदस्य, नानासाहेब भक्ते, शामराव गायके, गोविंद घारगे, राजेंद्र पसारे, मंझूर तांबोळी, संजय जाधव, भागवत भक्ते, मारुती इंगळे,  अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ, वैभव डिगे, यांनी परिश्रम घेतले  विजेत्यांना उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.


 
Top