कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगारात ४० वया वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि . २२ एप्रिल रोजी धर्मवीर आनंद दिघे योजनेअंतर्गत कळंब आगारात करण्यात आले होते . या शिबिरात ११० वाहक ,चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता . या शिबिरात सीबीसी ,थायरॉईड ,ब्लड शुगर , एचबी ,एआयसी ,कोलेस्ट्रॉल ,लिव्हर फंक्शन ,किडनी फंक्शन सह आदी प्रकारच्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागनाथ धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . शरद दशरथ ,डॉ . स्वप्नील शिंदे ,लक्ष्मीकांत मुंडे ,श्री तांबारे नेत्र विभागाचे श्री शेख ,आय सीटीसी विभागाचे ईश्वर भोसले,परशुराम कोळी ,तानाजी कदम,भाऊ वाकचौरे आदींनी हे शिबिर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.