धाराशिव (प्रतिनिधी)- आपले पाल्य महाविद्यालयात गेले की आपली भूमिका संपली ! असाच बहुतेक पालकांचा समज असतो. यामधूनच मग अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक पालकाची ही आपल्या पाल्याच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते .  पालकांनीही सजगपणे वेळोवेळी महाविद्यालयाच्या संपर्कात राहून आपल्या पाल्याविषयी माहिती घेतली पाहिजे असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी केले .

नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळाव्याचे आयोजन केले होते .यावेळी ते बोलत होते .

विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या पालक मेळाव्यात बहुसंख्य पालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते . या मेळाव्याची भूमिका विशद करताना अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते म्हणाले की कोरोना काळामध्ये बरेचसे कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत होते. त्यामुळे प्रत्यक्षात रोजगार मेळावे कमी भरले. पण नुकताच जेव्हा महाराष्ट्र शासनाचा पंडित दीनदयाळ शर्मा रोजगार मेळावा इथे भरला तेव्हा तेथील मागणीवरून मेकॅनिकल इंजिनियर ची किती आवश्यकता आहे हे लक्षात आले. या क्षेत्रातील वाढत्या गरजेनुसार तज्ञ अभियंत्यांची अत्यंत गरज आहे .येणारा काळ हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी सुवर्णकाळ असून रेडी इंजिनियर्स तयार करणे ही महाविद्यालयाची खूप मोठी जबाबदारी आहे .त्या दृष्टीने महाविद्यालय कटिबद्ध असून विद्यार्थी मेकॅनिकलच्या ज्ञानाबरोबरच सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा कसा परफेक्ट होईल या दृष्टीने अनेक कोर्सेसचे आयोजन महाविद्यालय वर्षभरात करत असते. याची पालकांनाही माहिती व्हावी या दृष्टीने या पालक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे .

यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वरिष्ठ प्रोफेसर ए झेंड पटेल म्हणाले की ,

विद्यार्थ्यांकडे आम्ही अनेक सूचना व्यक्त करतो .परंतु त्या पालकाकडे  पोहोचतीलच असे नाही. त्यामुळे पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र बसून अनेक समस्यांचे निराकरण करता येते. या पालक मेळाव्यासाठी जिल्ह्यातून पर जिल्ह्यातूनच नव्हे तर थेट कुवेत आणि दुबई मधून पालक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी या ऑनलाइन मेळाव्यामुळे आपल्याला महाविद्यालयाशी संपर्क साधता आला याविषयी आनंद व्यक्त केला. तसेच इतर देशांमध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा वाढता स्कोप असल्यामुळे विद्यार्थ्यांनी डिग्री बरोबरच कौशल्य आत्मसात करावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा आर एम शेख यांनी सुरुवातीलाच केले. आपल्या प्रास्ताविकात  त्यांनी संपूर्ण विभागाचा आढावा विद्यार्थी आणि पालकांसमोर ठेवला.

तसेच या मेळाव्यात पालकांकडूनही सूचना अपेक्षित असून त्यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. यानंतर पालकांमधूनही अनेक प्रतिक्रिया आल्या. पालकांनी महाविद्यालयात असलेल्या शिस्तीबद्दल समाधान व्यक्त करून काही गोष्टींची मागणी केली .यामध्ये कॉम्प्युटर कोर्स,मेकॅनिकल सॉफ्टवेअर याविषयी विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्यासाठी महाविद्यालयाने अधिक प्रयत्न करावेत अशी विनंती केली. तसेच मुलांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडण्यासाठी महाविद्यालयाने शैक्षणिक ,औद्योगिक सहलीचे आयोजन करावे अशी ही विनंती केली. पालक मेळावा ऑफलाइन असावा अशी ही काही पालकांची मागणी आली. तर ऑनलाईन वर खुश होणारे ही यामध्येच काही पालक होते.

 
Top