धाराशिव (प्रतिनिधी)- जम्मू काश्मिर येथील पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दि.28 रोजी भारत सरकारला निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात धाराशिव शहरातील मुस्लीम समाज प्रतिनिधीक स्वरुपात एकत्र येवुन निवेदनाद्वारे जम्मू कश्मिर येथील पहलगाममधील जो भ्याड दहशतवादी हल्ला करुन अतिरेक्यांनी ज्या निष्पाप 26 लोकांचे बळी घेतले आहेत तसेच अनेक लोकांना जखमी केले आहेत त्या घटनेचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत.

पहलगाममधील पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला हा पुर्व पदावर आलेल्या शांत काश्मिरीयतवर झालेला हल्ला आहे तिथल्या जीवन, रोजगार आणि देशाशी एकरुप होण्याच्या लोकांच्या भुमीकेरवरच हा हल्ला आहे. सदर निंदनीय घटनेस ज्या व्यक्ती, संस्था, संघटना व देश जबाबदार आहेत तें शोधुन त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही होवुन निषेध व्यक्त झाला पाहिजे. सरकारने या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकाला जबर किंमत मोजायला लावली पाहिजे या कृतीसाठी देशातील पुर्ण जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहील. सरकारने योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करुन या हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप लोकांचा बळी गेलेले आहेत त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना योग्य प्रकारे न्याय द्यावा ही विनंती दिलेल्या नियोजनात म्हटले आहे.

यावेळी मसूद शेख, सज्जायोद्दीन शेख, पटेल मेहबूबपाशा, शेख अनवर,  बाबा मुजावर ,बिलाल तांबोळी, वाजिद खान पठाण, शेख इस्माईल ,काझी एजास,शेख अतिक, कादर खान, मैनोद्दीन पठाण, आयाज शेख, काझी मुज्जमील, फिरोज शेख, इमरान खान, गफूर शेख, खलिफा कुरेशी, असद पठाण, ईस्माल शेख, फरमान काझी, जाखेरखॉ पठाण, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.


 
Top