धाराशिव (प्रतिनिधी)- माणुस हा केंद्रबिंदु मानुन राज्य घटना लिहिली आहे. मार्गदर्शक तत्व देण्यात आली आहेत. आर्थिक विषमता कमी झाले पाहिजे. संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. संविधानाच्या माध्यमातुन नागरिकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय सुनिश्चित करते असे प्रतिपादन प्रा. डी. डी. मस्के यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. अधिसभा सदस्य देविदास पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुंडे आशुतोष, ढगे प्रतिक्षा, पंडित सुप्रिया यांनी निबंध स्पर्धा मध्ये अनुक्रमे तृतीय, द्वितीय, व प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 तास अभ्यास उपक्रमात सहभागी प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. झाकडे, डॉ. मोले, यांचा व विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक व कार्यकर्माचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, सुजान नागरिक बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.