परंडा (प्रतिनिधी)-‌‘राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः“ हा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली. आज भाजपा स्थापना दिवसानिमित्त भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भाजपा नेते माजी.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भारतमातेचे पुजन करून ध्वजारोहण केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. परंडा गटनेते सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते गोपालसिंह ठाकूर, समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, जिल्हा युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे डॉ. आनंद मोरे, डॉ. अमोल गोफणे, मुकुंद चोबे, अजित काकडे, रामदास गुडे, जयंत सायकर, मनोहर पवार, गजानन तिवारी, मिलिंद शिंदे, अमर ठाकूर, किरण पांडे, व्यंकटेश दिक्षित, आप्पा मदने, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. ज्योती भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top