उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे.कोळेवाडी येथुन प्रतिवर्षाप्रमाणे श्री.क्षेत्र गाणगापुर देवस्थानकडे पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवार दि.1 एप्रिल रोजी कोळेवाडी ता.उमरगा येथून प्रस्थान झाले. याप्रसंगी शिवसेना उपनेते तथा उमरगा लोहारा तालुक्याचे मा.आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्या शुभहस्ते पूजन व आरती करण्यात आली. ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, ज्ञानेश्वर पालमपल्ले मा.सरपंच, ह.भ.प.बळीराम महाराज इरले, ह.भ.प.उद्धव महाराज पालमपल्ले, व्यंकट गव्हाळे, इंद्रजीत गलांडे, राजू करनुरे, बालाजी करनुरे, नरसिंग लंजारे, सिद्राम पालमपल्ले, यशपाल कांबळे, विठ्ठल पालमपल्ले आदी भक्तगण व कोळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top