नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहर तालुक्याचे भाजपा अध्यक्षपदी येथील माजी नगरसेवक बसवराज धरणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. दरम्यान धरणे यांच्या निवडीचे शहर व परिसरातुन जोरदार स्वागत करण्यात येत आहे. शहरत त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. धरणे यांच्या निवडीने भाजपाचे बळ वाढणार आहे, कारण धरणे यांच्याकडे शहरात एक वजनदार नेतृत्व म्हणून पाहीले जात आहे.

दि. 20 एप्रील रोजी भाजपाच्या झालेल्या बैठकीत एकमताने नळदुर्गचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे नेते सुनील चव्हाण यांचे कटटर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बसवराज धरणे यांच्या गळयात नळदर्ग शहर तालुक्याचे अध्यक्षपद पडले आहे. दरम्यान एका युवकाच्या हाती अध्यक्षपदाची सुत्रे मिळाले असल्याने निश्चीत नळदुर्ग शहरात व ग्रामीण भागात भाजपाला मोठे बळ मिळणार आहे. येणाऱ्या नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत सिमीती निवडणुकीत याचा फायदा भाजपाला होणार आहे. कारण धरणे यांचे शहरासह ग्रामीण भागात ही चांगला संपर्क असून ते राजकारणा बरोबर सामाजिक कार्यात ही अग्रेसर असतात. त्यामुळे पुढील काळात धरणे यांचा भाजपाला नक्कीच फायदा होणार आहे. शिवाय आज पर्यंतच्या इतिहासात नळदुर्ग शहर तालुक्याचे नेतृत्व करण्याचे संधी धरणे यांच्या रुपाने भाजपाला मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे नेते सुनिल मधुकरराव चव्हाण व भाजपाचे पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले.


 
Top