धाराशिव (प्रतिनिधी)- नगर वाचनालय धाराशिव च्या अध्यक्षपदी नितीन तावडे व सचिव पदी श्रीकांत साखरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
ज्येष्ठ सदस्य अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नगर वाचनालय कार्यकारिणीची बैठक दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी वाचनालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर बैठकीत नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी नितीन तावडे व सचिवपदी श्रीकांत साखरे यांची निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे निवडण्यात आले. सहसचिव अंबादास दानवे, उपाध्यक्ष प्रा. डॉ.सतीश कदम, कोषाध्यक्ष शरद मुंडे, समन्वयक प्रदीप साळुंके, बांधकाम विभाग आशिष मोदाणी, प्रसिद्धी विभाग बालाजी तांबे, वाचन विभाग सुभाष पाटोळे, ग्रंथ खरेदी विभाग ॲड. रमेश सूर्यवंशी, साहित्य व सांस्कृतिक विभाग सौ. प्रज्ञा सुरेश शेळके यांची निवड करण्यात आली. धाराशिव येथील नगर वाचनालय हे मराठवाड्यातील अव्वल दर्जाचे आहे. 1000 पेक्षा अधिक आजीव सभासद असून सुमारे 1480 वाचक सभासद आहेत. वाचनालयात 90 हजार पेक्षा अधिक ग्रंथ संपदा आहे. वाचन चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोदय नूतन अध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केले. सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.