नळदुर्ग (प्रतिनिधी)- पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करून या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्या सर्व पीडित दुःखी कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दिनांक 20 एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करून 27 पर्यटकांना ठार केले. या भ्याड हल्ल्याचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जाहीर निषेध व्यक्त केला असून दुःखी कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या हल्ल्याचा भारत नक्कीच बदला घेईल त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात पाकिस्तानला जाण्यास सांगितले असून सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला चांगलीच.चपराक दिली आहे. आता या हल्ल्याच्या विरोधात भारताने पाकिस्तानवर कारवाई केली तरच पाकिस्तानवर भारताचा वचक बसणार आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आता बदला घेणे गरजेचे आहे.