धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आज धाराशिव विमानतळ येथे विमानाने आगमन झाले.पालकमंत्री श्री.सरनाईक यांचे आगमन प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी पुस्तक देऊन तर पोलीस अधीक्षक संजय जाधव व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,एस टी चे विभाग नियंत्रक विनोद भालेराव,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांची उपस्थिती होती.