धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व पहायला मिळाले. 4 जागा बिनविरोध झाल्यानंतर 9 जागापैकी 8 जागावर विजय मिळवला. जिल्हा मजूर संघाच्या स्थापनेपासून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व होते. त्यानंतर त्यांचे पुत्र भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली. 13 पैकी 12 जागा महायुतीच्या ताब्यात आल्या.
2025-29 च्या पंचवार्षिक निवडणूक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. एक मतदार थेट दिल्लीहून विमानाने आणला होता. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलचे 13 र्पैकी 12 उमेदवार निवडून आले. आमदार पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरूवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 9 जागासाठी निवडणूक झाली होती. त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ 1 मताने जिंकली व आमदार पाटील यांच्या पॅनलच्या 8 जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.