भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय जनगणचे काम सुरु झाले असून या कामासाठी दिव्यांग शिक्षक, महिला शिक्षिका,बीएलओ शिक्षक,गंभीर आजार असलेले शिक्षक यांना वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भूम च्या वतीने तहसीलदार भूम यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भूमच्या वतीने तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पुढील प्रमाणे मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले.
बीएलओ यांना जनगणनेचे स्वतंत्र आदेश देऊ नयेत. दिव्यांग शिक्षकांची नियुक्ती करू नये.गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना जनगणना काम देऊ नये. ग्रामीण भागातील वाढीवस्तीवर फिरून काम करावे लागणार असल्याने महिला शिक्षकांची नियुक्ती टाळावी. यासंदर्भात नायब तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तहसीलदार साहेब रजे वरून आल्यावर त्यांच्या हे पत्र निदर्शनास आणून देतो असे आश्वासित करण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ, तालुकाध्यक्ष संजीवन तांबे, कार्याध्यक्ष दीपक वाळके, कोषाध्यक्ष दत्ता घुले, सरचिटणीस दत्तात्रय गुंजाळ, प्रवक्ता संदीप शिंदे, मार्गदर्शक सुनील गुंजाळ, अंगद मिसाळ, गोकुळ आरेकर, अच्युत मुळे, श्रीराम हांगे, शहाजी पंडित, गोविंद बाचेवाड, परशुराम थाटे, धैर्यशील नरके, माधव पोतरे, दत्ता मडके आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा काशीद, तांबे, तालुकाध्यक्षा लक्ष्मी इंगळे/गुंजाळ, कार्याध्यक्ष स्मिता जंजिरे /ढगे, सारिका राऊत, सरचिटणीस जयश्री सोनवणे/कुंभार, प्रसिद्धीप्रमुख अर्चना खोसे/ नरके, उपाध्यक्ष शुभांगी नाईकवाडी, राजूबाई गोपाळघरे/घुले, धनलक्ष्मी पोतरे, शिल्पा भडंगे /काळे, मीना दुणगे, श्रीमती सोनिया शेटे/राऊत, लक्ष्मी सानप/बागर आदी उपस्थित होते.
