तुळजापूर (प्रतिनिधी)-आमचे स्वमालकीचे शेतात विहीर व शेततळे बांधण्याची परवानगी देण्याची मागणी उमरगा चि येथील सहा शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि आमच्या सर्वांच्या शेतातुन रिन्यु पावर प्रा.ली. या पवनचक्की कंपनीचे विद्युत वाहक टावर लाईन उभारणीचे काम चालु असुन सदर कंपनीने आम्हाला फसवणूक करुन सदरील टावरचे काम आम्हा शेतकऱ्यांची कसलीही लेखी परवानगी न घेता सदर काम हे सरकारी असुन शेतकरी या कामाला अडवु शकत नाहीत. सदर कामात शेतकऱ्यांच्या परवानगीची गरज नाही असे सांगुन आजतागायत जबरदस्ती काम करत आलेले आहेत. परंतु सुरुवातीपासूनच या कंपनीने आम्हा शेतकऱ्यांची दिशाभुल करुन टावरचे काम जबरदस्तीने केलेले आहे. यासंदर्भात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळुन उपविभागीय कार्यालय धाराशीव येथे रिन्यु कंपनी विरोधात रितसर तक्रार दाखल केलेली असुन त्याची कार्यालयीन कारवाई चालु आहे.
आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक असुन आम्हाला शेतीसाठी उन्हाळ्यात पाणी कमी पडते. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आमचे वैयक्तिक शेतात विहीर व शेततळे बांधण्याचा विचार गेल्या 3 वर्षांपासून करत आहोत. परंतु ही रिन्यु पवनचक्की कंपनी आम्हाला आमच्या स्वमालकीच्या शेतात तुम्ही विहीर किंवा शेततळे करता येणार नसल्याचे सांगत आहे. कारण की त्यांच्या वैयक्तिक टावरलाईनमुळे आम्ही आमच्या शेतात विहीर किंवा शेततळे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करु अश्या स्वरूपाच्या धमक्या आम्हाला ही रिन्यु कंपनी आम्हास विहीर व शेततळे करण्यास बळपूर्वक विरोध करत असुन आम्ही शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालय 'स्वताच्या शेतात विहीर कींवा शेततळे बांधने हे कायदेशीर रित्या चुकीचं असल्याचे सल्ले ही कंपनी आम्हास देत असुन मुळात या खासगी पवनचक्की कंपनीने आमचे शेतात टावर उभा करत असताना आम्हा शेतकऱ्यांची 100 रुपयांच्या मुद्रांकावर रितसर लेखी परवानगी घेणे कायदेशीर रित्या बंधनकारक असताना आमची कसलीही लेखी परवानगी न घेता. जबरदस्तीने टावरचे बांधकाम करुन आम्हा शेतकऱ्यांना फसवीले असुन उलट आम्हालाच आमचे स्वमालकीचे शेतात विहीर किंवा शेततळे बांधण्यास मज्जाव करुन आम्हा शेतकऱ्यांना कायमचे संपवण्याचा घाट या रिन्यु कंपनीने घाटला असुन आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आता बिनपाण्याची शेती कशी करावी याचे उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे असुन, तरी आपण तालुका महसुली प्रशासक तथा दंडाधिकारी या नात्याने आमच्या वैयक्तिक शेत जमिनीत विहीर व शेततळे बांधण्याची रितसर परवानगी द्यावी व रिन्यु कंपनीस योग्य तो समज
द्यावा व तसेच जमीनमालकाची कुठलीही लेखी परवानगी न घेता आमच्या वैयक्तिक शेतजमीनीत टावरचे बांधकाम केल्याबद्दल रिन्यु कंपनीच्या बेकायदेशीर टावर कामाची चौकशी करुन कंपनीवर कारवाई करुन तहसीलदार यांनी दुष्काळात होरपळनाऱ्यां शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती. जर आम्हा सर्व शेतकऱ्यांना आमचे वैयक्तिक शेतजमीनीत विहीर व शेततळे बांधण्याची परवानगी नाही मिळाल्यास आम्हा सर्व टावरबाधीत शेतकरी वर्गाला आत्मदहन केल्याखेरीज पर्यायच उरणार नाही याची विशेष नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटलं आहे.