तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्री पूजा काळे यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. कलर्स मराठी या वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या 'आई तुळजाभवानी' या मालिकेमध्ये पूजा काळे यांनी तुळजाभवानी देवींची भूमिका साकारली आहे. श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना पूजा काळे यांनी व्यक्त केल्या.
कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर 'आई तुळजाभवानी' हि मालिका प्रदर्शित केली जाते. आतापर्यंत मालिकेचे दिडशे भाग प्रदर्शित झाले आहेत. पूजा काळे यांच्यासोबत कलर्स मराठी वाहिनीच्या जयश्री नागपुरे, जयदेव सावंत व इतर सदस्य उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीने अभिनेत्री पूजा काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश मोटे, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर, पवन पांडे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.