उमरगा (प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षा पासून सर्व सामान्य जनतेच्या पाठींब्या मुळेच पाटील परिवाराला समाजसेवेची परंपरा लाभली आहे. समाजसेवा हि ईश्वर सेवा आहे. सर्व सामान्यांची सेवे मुळे आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मिळते. असे सांगून जनतेच्या आशिर्वादामुळेच समाजसेवा करण्याला ताकद मिळते. सर्वसामान्यांच्या रुग्ण सेवेमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. संपूर्ण आयुष्य समाजसेवे साठी समर्पित करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी केले.

शरण पाटील फाऊंडेशनच्या वतीने चार व पाच मार्च रोजी येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील विविध आजारांच्या रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर, दिव्यांगाचे विविध साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले. यावेळी शरण पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील होते. श्रमजीवी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, रामकृष्णपंत खरोसेकर, मल्लीनाथ दंडगे, बसवराज कस्तुरे, व्यकंट लामजणे, सुरेश गवसाणे, अमित भरडे, मदन पाटील, सचिन पाटील, धनराज पाटील, प्राचार्य डॉ. आशोक सपाटे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, दिलीप भालेराव प्रा. डॉ. शौकत पटेल सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

विनायकराव पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी 301 रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्रवणयंत्र, व्हील चेअर, द्राय सायकल, मोटार राईज द्राय सायकल, वॉक्स, अंधकाटी 335 दिव्यांग लाभार्थीना या साहित्याचे वाटप करण्यात आले. महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड, चंद्रशेखर पवार, रफिक तांबोळी, सचिन पाटील, राहुल हेबळे, राजू मुल्ला, अनिल पपू सगर, पंकज खरोसेकर, विक्रम मस्के, आकाश पाटील, सुजीत शेळके आदि सह शरण पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम पेठकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले. आभार पंकज खरोसेकर यांनी मानले.

 
Top