भूम (प्रतिनिधी)- हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आपल्यामुळे सर्व स्तरातून या हत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मस्साजोगचे  सरपंच संतोष देशमुख यांच्या  हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतपाची लाट पहायला मिळाली. काल बीडच्या बंद नंतर आज सकाळपासून बंदची हाक देण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील समर्थक आणि विविध संघटनाकडून हा बंद पुकारण्यात आला असून तशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. 

आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी सकाळी भूम येथील गोलाई चौकात समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तर सर्व तालुक्यात  व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली.

 
Top