तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ शहरातील धाराशिव रोड वरील गवते प्लाँटींग येथे मायलेकी ने घरात गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवली. सदरील घटना मंगळवार दि.25 मार्च रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, शहरातील धाराशिव रोडवर गवते प्लाँटींग असुन रत्नमाला संजय पवार या येथे राहत होत्या. रत्नमालाचे पती शिक्षक आहेत. रत्नमालाचा एक मुलगा विदेशात शिक्षण घेत आहे. मुलगी प्रतिक्षा तुषार पाटील वय 23 रा. सापटणे, ता. टेभुर्णी जि. सोलापूर यांचे डीएड शिक्षण झाले आहे. प्रतिक्षाचे सहा महिन्यापुर्वी लग्न झाले होते. दोन दिवसापुर्वी ती आईकडे आली होती. रत्नमाला संजय पवार वय 45, प्रतिक्षा तुषार पाटील वय 23 या दोघांनी मंगळवार दि. 25 मार्च रोजी दोघांनी घरातील खिडकिस गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्याला मुलगी दिल्याचा कारणावरुन ही आत्महत्या झाल्याची चर्चा होत आहे माञ सुशिक्षित सधन कुंटबातील दोन महिलांनी आत्महत्या केल्याने सर्वञ आश्चर्य व्यक्त केले जात आहे.