भूम (प्रतिनिधी)-प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त संसार उपयोगी वस्तू भव्य बक्षीस योजना खेळ खेळूया पैठणी जिंकूया चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिने तारखा माधवी निमकर या मुख्य आकर्षण असणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे या असणार यावेळी जे एस पी एम संकुलाच्या समन्वयक ज्योती धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच छत्रपती संभाजी महाराजां च्या जीवनावर आधारित छावा हा मराठी चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेसमोरील प्रांगणात करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौ संयोगिता संजय गाढवे महिला मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 8 रोजी खेळ खेळूया पैठणी जिंकूया या संसार उपयोगी वस्तू भव्य बक्षीस योजना लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम बक्षीस स्कुटी, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस फ्रीज, चौथे बक्षीस दिवाण, पाचवे बक्षीस सोपासेट, सहावे बक्षीस टीव्ही, सातवे बक्षीस राजाराणी कपाट, आठवे बक्षीस कुलर, नववे बक्षीस ड्रेसिंग टेबल, दहावे बक्षीस गॅस शेगडी , अकरावे बक्षीस मिक्सर विजेत्यांना देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक महिला कलाकारांसाठी 108 मानाच्या पैठण्या देण्यात येणार आहेत. रविवार दिनांक 9 सोमवार दिनांक 10 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारा छावा हा हिंदी चित्रपट महिलांसाठी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री नऊ वाजता पुरुषांसाठी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 8 रोजी खेळ खेळूया पैठणी जिंकूया या कार्यक्रमाचा तसेच दिनांक 9 व 10 रोजी मोफत छावा या चित्रपटाचा मोफत लाभ घेण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा तथा नियोजन समितीच्या सदस्य संयोगिता गाढवे यांनी केले आहे.