तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरीषदच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार नुतन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सोमवार दि. 24 मार्च रोजी प्रथम श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन पदभार स्विकारला. अखेर अडीच वर्षाने पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने तुळजापूरकरांना दिलासा मिळाला आहे.
पदभार स्विकारल्या नंतर अधिकारी कर्मचारी यांचाशी संवाद साधताना रणदिवे म्हणाले, तिर्थक्षेञ तुळजापूर येथे काम करण्याची संधी मिळाल्याने श्रीतुळजाभवानी मातेची सेवा करण्याची संधी मला मिळाल्याचे मी मानतो. भाविक शहरवासिय यांना मुलभुत सुविधा देण्यास माझे प्राधान्य राहिल. या कामी आपण सर्वांनी शहरवासियांनी सहकार्य करावे असे शेवटी आवाहन केले. तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरीषद मुख्याधिकारी पद मानाचे, कामाचे, दामाचे माञ येथे येण्यास कुणीही इच्छुक नसल्याने येथील मुख्याधिकारी पद दोन वर्षापासुन प्रभारी कडे होते. अखेर पुणे जिल्हयातील राजगुरुनगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांची तुळजापूर नगरपरीषद मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील रखडलेले विकास कामांना चालना मिळेल व भाविक शहरवासियांना स्वछ सुंदर तिर्थक्षेञ पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. लवकरच तुळजापूर विकास आराखडा मंजुरी मिळणार असल्याने यात मुख्याधिकारी रणदिवे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.